स्मृतिकाव्य : भेटूं या एकदा पुन्हां

( प्रियपत्नी डॉ. स्नेहलता हिच्या निधनाला २०१६ च्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी
एक वर्ष झालें. त्यानिमित्तानें तिच्या स्मृत्यर्थ. )

सहजीवन सरलें , तरि भंवती अजुन खुणा
सखये, आपण भेटूं या एकदा पुन्हां ।।

ठाउक होतें ‘सोडुन जाणें’,
कां गेलिस पण नकळत ?
भेट घडविली ज्या नशिबानें,
तयेंच केलें आहत !
मला कळेना, मी भाग्याचा केला होता काय गुन्हा ?

देह आपुला मर्त्य असे,
प्रियतमे, कळे मज
अंतिम हें जरि सत्य असे,
पण, स्मृती छळे मज
गेलिस तूं, तरि अजून उरला आठवणीभरला खजिना ।।

जें झालें तें झालें, आतां
पुनरपि ये तूं
जवळ येउनी, हातीं हाता
पुनरपि घे तूं
पुनरपि उमलो वठल्या हृदयीं अपुला मीलनचैत्र जुना ।।
+ + +

– सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph- Res- (022)-26105365. M – 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com,
www.snehalatanaik.com

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*