No Picture
Marathi Poems

पंढरीचा राणा : उतरला ईश्वर धरेवरी

उतरला ईश्वर धरेवरी सगुणरूप धारलें परब्रह्मानें पंढरपुरीं ।। वैकुंठींचा प्रभु नारायण करतो जो विश्वाचें पालन, कलियुगात म्हणती विठ्ठल, तो हरी असे द्वापरीं ।। क्षीरसागरा मागे ठेवुन शेषनाग-मंचकास त्यागुन नसे गरुडही, उभा एकला तिष्ठत विटेवरी ।। […]

No Picture
Marathi Poems

पंढरीचा राणा : विठूचे पद मजला लाभावे

विठूचे पद मजला लाभावे देह मातिचा बनण्यां कांचन, अन्य कशास हवें ? नच माहित, मेघांच्या मागे विठ्ठल दिसतो कां कुणां ? असती कां क्षितिजापल्याड श्रीविठ्ठलवस्तीच्या खुणा ? विठू भक्तहृदयीं वसतो, पण, ठाम मला ठावें ।। […]

No Picture
Marathi Poems

पंढरीचा राणा : मी विलीन झालो

पांडुरंग रंगीं रंगुन नामामृता प्यालो पांडुरंग अंतरंगीं, मी विलीन झालो ।। द्वैत आणि अद्वैतातिल फरक मज कळेना निर्गुण-सगुणातिल मजला भेद आकळेना तरी परब्रह्म दिसलें, धन्य धन्य झालो ।। नकळतांच हृदयीं मोठा चमत्कार झाला निमिषातच माझा […]

No Picture
Marathi Poems

पंढरीचा राणा : मला विठ्ठलाचा विरह सोसवेना

अजूनी दिसेना पंढरीचा राणा मला विठ्ठलाचा विरह सोसवेना ।। बुवा-साधु-स्वामी यांचे पाय वंदिले मी पुजारी नि पंडित यांचे पंथ धुंडले मी परी विठ्ठलाच्या दारीं कुणी पोंचवेना ।। पांडुरंगभेटीपुढती खुजे सप्तस्वर्ग दुर्बल मी, दुर्गम दुष्कर नरजीवनमार्ग […]

No Picture
Marathi Poems

पंढरीचा राणा : आधाराचा हात देई पंढरीचा नाथ

ठेचकळे आंधळा मी काळोख्या पथात आधाराचा हात देई पंढरीचा नाथ ।। चुकीचाच धरला रस्ता, असा चालतो मी – विषयवासनांच्या पंकीं अजुन लोळतो मी मद-मत्सर-मोह यांचा संग नसे जात ।। जरी मी न जाऊं शकलो कधी […]

No Picture
Marathi Poems

पंढरीचा राणा : नांव पांडुरंग कसें ?

नांव पांडुरंग कसें ? (गझलनुमा गीत) रंग तुझा सावळाच, नांव पांडुरंग कसें ? लक्ष भक्त पाहतात लक्ष तुझे रंग कसे ? हात कटीवर ठेवुन विटेवरी स्तब्ध उभा रूप तुझें ठायिं ठायिं तरि भक्तांसंग कसें ? […]

No Picture
Marathi Poems

पंढरीचा राणा – (९) : (आषाढी एकादशीनिमित्तानें) : मज हवी पंढरीवारी

February 19, 2017 सुभाष नाईक 0

यात्रा चारीधाम नको, मज हवी पंढरीवारी देवांचाही देव तिथें विठु , भक्तांचा कैवारी ।। नेत्र मिटुनही अंत:चक्षू रूप पाहती त्याचें झोपेमध्येसुद्धां विठ्ठलमूर्ती नयनीं नाचे अखंड विठ्ठलमहिमा गाती या वाचा चत्वारी ।। भान हरपलें, प्राण हरखले, […]

No Picture
Marathi Poems

स्मृतिकाव्य : भेटूं या एकदा पुन्हां

November 1, 2016 सुभाष नाईक 0

( प्रियपत्नी डॉ. स्नेहलता हिच्या निधनाला २०१६ च्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी एक वर्ष झालें. त्यानिमित्तानें तिच्या स्मृत्यर्थ. ) सहजीवन सरलें , तरि भंवती अजुन खुणा सखये, आपण भेटूं या एकदा पुन्हां ।। ठाउक होतें ‘सोडुन जाणें’, […]

No Picture
Marathi Poems

( कोजागरी प्रीत्यर्थ ) : गोकुळ – ३ : धुंद सुरूं रास

October 12, 2016 सुभाष नाईक 0

(चाल : पारंपारिक गरबा / डांडियाची ) नृत्य गोपगोपींचें , धुंद सुरूं रास वृंदावन लोटलें शरद-उत्सवास ।। केशकलापीं गोपी माळती फुलें वेण्यांचा संच दाट लांबवर झुले चंपक, जुइ, मोगरा, दरवळे सुवास ।। वस्त्रांतुन एकएक रंग […]

No Picture
Marathi Poems

( नवरात्रि व दुर्गापूजा निमित्तानें ) : माते दुर्गे चंडिके

जय दुर्गे चंडिके माते, हे दुर्गे चंडिके तुझ्या वरदहस्ताविण, माते, जग ना चालुं शके ।। तूं चामुंडा, काली माता अंबा, ‘शेरोंवाली’ माता वेगवेगळें रूप तुझें भक्तांच्या मनिं झळके ।। रुंड चेचशी पायाखालीं मुंडमालिका कंठीं घाली […]