ये ज़वळ बस (स्मृतिकाव्य)

‘ये, जवळ बस’ म्हणालीस तूं,
मी बसलोही
क्षीण तुझा कर करीं घेउनी
सुखावलोही .
नव्हतें माहित, ‘उद्या’ परंतू
काय व्हायचें होतें
‘उद्या’च येथुन कायमचें तुज
दूर ज़ायचें होतें.

– – –
( दिवंगत प्रियपत्नी डॉ. स्नेहलता
हिच्या आठवणीत )

– सुभाष स. नाईक

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*