ग़ज़ल आणि स्वर-काफिया

नोव्हेबर २०१७ ला वाशीमध्ये भरलेल्या ग़ज़ल संमेलनात प्रेक्षकांमधील एका गृहस्थानें  (जो स्वत: कवी व गझलकार आहे) , स्वर-काफियाबद्दल प्रश्न विचारला असतां, मंचावरील ज्येष्ठ ज्ञानवंतांनी उत्तर दिलें की,  ‘शक्यतो स्वर-काफिया वापरूं नये, शुद्ध-काफिया वापरावा’.

 

त्या विचाराशी मी स्वत: सहमत नाहीं.

 

( टीप  :  कुठल्याही ज्ञानवंताचा अधिक्षेप करायचा माझा किंचितही उद्देश नाहीं . मात्र, त्यांनी मांडलेल्या उत्तरापेक्षा माझें मत भिन्न आहे. इंदौरला हायस्कूलमध्ये असल्यापासून, गेली ५७-५८ वर्षें मी उर्दू-हिंदी शेरोशायरी वाचत आलेलो आहे. भिन्नभिन्न भाषांमधील ग़ज़ला वाचून ;  हिंदी-हिंदुस्तानी-उर्दू, मराठी व इंग्लिश भाषांमधील ‘जानेमाने’ समीक्षकांच्या ग़ज़लविषयक ग्रंथांचें वाचन-मनन करून; गेली पंचवीस-तीस वर्षें  स्वत: मराठी-हिंदी/हिंदुस्तानी-इंग्रजी ग़ज़ला व ग़ज़लांवर लेख लिहून; आणि स्वत: चिंतन करून, मी माझें मत बनवलेलें आहे. )

 

वाचकांसाठी मी या विषयावरील माहिती पुढे  मांडत आहे .

 

विभाग – १

 • ग़ज़लच्या व्याकरणाची अल्प माहिती :

ग़ज़लच्या  ( गझलच्या ) जाणकारांना काफिया म्हणजे काय, स्वर-काफिया म्हणजे काय, हें सांगायला नको. परंतु असेही जन आहेत, जे ग़ज़लवर प्रेम करतात, पण तिच्या व्याकरणासंबंधी फार-शी माहिती त्यांना नसते. म्हणून आपण थोडासा ऊहापोह करूं या.

 

ध्यानात घ्या, आपण ग़ज़लच्या व्याकरणाच्या खोलात जाणार नाहीं आहोत ; फक्त आपल्या विषयापुरती माहितीच बघणार आहोत.

 

 • गज़लमध्ये साधारणतया ५ किंवा अधिक शेर ( द्विपदी ) असतात. प्रत्येक शेर स्वयंपूर्ण असतो.
 • प्रत्येक ओळीला ‘मिसरा’ म्हणतात.
 • ( पहिल्या व दुसर्‍या मिसर्‍याला काय नांव आहे, तसेंच ते कशा प्रकारें लिहिलेले असतात, त्यांची खासियत काय ; मक़्ता, वज़न , बह्,र,  अशा अनेक गोष्टींची माहिती  आपल्याला देतां-घेतां येईल;  पण तूर्तास, आपल्या चर्चेसाठी त्यांची आवश्यकता नाही) .
 • गज़लमध्ये दोन प्रकारची यमकें असतात. ‘अंत्ययमक’ म्हणजे खरें तर एक शब्द किंवा शब्द-समूह असतो. त्याला ‘रदीफ’ म्हणतात. (मूलत: अरबी-फारसी-उर्दूमध्ये हा शब्द स्त्रीलिंगी आहे ; पण मराठीत हल्ली तो शब्द पुल्लिंगी वापरायची प्रवृत्ती वाढलेली आहे ).
 • अंत्ययमकाच्या आधी आणखी एक यमक येतें , ज्याला काफिया म्हणतात. काफियात, शब्दाची अखेरचें अक्षर ( किंवा शब्दाच्या  अखेरची कांहीं अक्षरें) अपरिवर्तनीय रहातात, आणि त्याआधीची अक्षरें बदलतात.
 • पहिल्या शेरला ‘मत्ला’ म्हणतात. ( यावरून मराठीत ‘मथळा’ हा शब्द आला आहे). मत्ल्याच्या दोन्हीं मिसर्‍यांमध्ये ( ओळींमध्ये) रदीफ व काफिया असतात.

( कांहीं वेळा, ग़ज़लमध्ये एकाहून अधिक मत्ले असतात. मात्र , तूर्तास , आपण त्या बाबीत शिरणार नाहीं आहोत).

 • अन्य शेरांच्या पहिल्या पंक्तीत रदीफ-काफिया नसतात ; मात्र दुसर्‍या ओळीत ते असतात.
 • प्रत्येक शेर स्वयंपूर्ण असला तरी, सर्व शेर एकमेकांशी रदीफ-काफियानें जोडलेले असतात.

 

 • कांहीं उदाहरणें :
 • रदीफ-काफियाचें एक उदाहरण पाहूं या.

( हे माझ्या एका हिंदुस्तानी गज़लचे कांहीं शेर आहेत. हिची पूर्वप्रसिद्धी ,

‘येवा कोंकणात’ पाक्षिक, दि. ११.११.२०१७ ) –

मत्ला :

क़ाबू में नहीं मेरे, उस मन का क्या करूँ ?

उस दिल चुरानेवाले दुश्मन का क्या करूँ ?

 

पुढील कांहीं शेर :

वो ना दिखते , न सही ; पर अक्स तो दिखे

खिड़कीतले छुपा मैं, दर्पन का क्या करूँ ?

 

आग़ोश में आने को वो आगे बढ़ते भी

उड़ उड़ के बीच आए दामन का क्या करूँ ?

 

मैं दर्दे जिगर अपना दुनिया से छुपाता

पर आँख से बरसते सावन का क्या करूँ ?

 

( शब्दार्थ : अक्स : प्रतिबिंब ; आग़ोशआ: आलिंगन ;  दामन : मूल अर्थ ‘कमीज़ का आगे का छोर’ , मगर भारत में ‘आँचल’ यह अर्थ भी लिया जाता है । )

 

इथें ‘क्या करूँ’ हा शब्द-समूह रदीफ आहे.

काफियासाठीचे शब्द  आहेत – मन, दुश्मन, दर्पन, दामन, सावन.

 

 • आतां स्वर-काफियाचें एक उदाहरण पाहूं या, म्हणजे पुढील चर्चा सोपी जाईल.

( हें उदाहरण म्हणजे माझ्याच एक गज़लमधील कांहीं शेर आहेत . पूर्वप्रसिद्धी : वरीलप्रमाणेंच).

 

 

इश्क़ ज़िंदगी है,  इश्क फ़ना भी है

इश्क़ के लिये जान दी, जान ली है ।

 

इश्क ख़ुदा भी है, इश्क ख़ुदी भी है

अवतारे इश्क़ पे ही टिकी ख़ुदाई है ।

 

इश्क़ मुश्क़ है, इश्क़ पे फ़ख़्र है

शख़्स, दे सदा, ‘इश्क़ ही बंदगी है’ ।

 

(शब्दार्थ : फ़ना : मृत्यु ;  ख़ुदी :  स्वाभिमान, अस्मिता ; ख़ुदाई  : संसार, जगत् ;

                मुश्क़ : कस्तूरी, musk ; फ़क़्र : अभिमान ; सदा : पुकार ; बंदगी  : पूजा ).

 

इथें रदीफ, ‘है’ हा शब्द आहे. काफियासाठी वापरलेले शब्द  : भी, ली, ख़ुदाई, बंदगी.

इथें , ‘ई’ हा स्वर-काफिया आहे.

 

विभाग – २

आधुनिक भारतीय भाषांनी ग़ज़ल ही ‘ फारसी अथवा  दखनी_हिंदी / रेख़्ता / उर्दू / हिंदुस्तानी’ हिच्याकडून घेतली आहे , आणि त्यामुळे गज़लचे मूलभूत नियमही त्या भाषेप्रमाणेंच अन्य भाषाही पाळतात.

( टीप :  मराठीत ग़ज़ल माधव ज्यूलियन यांनी १९२० च्या दशकाच्या सुरुवातीला आणली,  ती फारसीपासून प्रेरणा घेऊन ; तर सुरेश भटांनी १९६० च्या दशकाच्या सुरुवातीला लिहिली ती उर्दूपासून ज्ञान घेऊन. माधवरावांनी हेतुत:, कांहीं मूळच्या नियमांचें पालन केलें नाहीं . भटांनी व्याकरणाच्या बाबतीत उर्दूचें अनुकरण केलें. असो.  )

 

मी , ‘स्वर-काफिया’ या विषयावर , उर्दूमधील कांहीं सुप्रसिद्ध ग़ज़लगोंच्या ‘स्वर-काफियावाल्या ग़ज़लां’च्या मत्ल्यांची कांहीं उदाहरणें  खाली देत आहे.  यांतील अनेक ग़ज़ला रसिकांनी वाचल्या    असतील, किंवा त्यांचें गायन ऐकलें असेल.

 • दर्द मिन्नतकशे दवा न हुआ

मैं न अच्छा हुआ, बुरा न हुआ ।

–       ग़ालिब

 • हम रश्क को अपने भी गवारा नहीं करते

मरते है वले उनकी तमन्ना नहीं करते ।

    (वलेलेकिन )

 • ग़ालिब

 • हर एक बात पे कहते हो कि तू क्या है

तुम्हीं कहो कि ये अन्दाज़े गुफ़्तगू क्या है ।

 • ग़ालिब

 • देख तो दिल कि जाँ से उठता है

ये धुआँ सा कहाँ से उठता है ।

 • मीर

       ( टीपइथें  ‘आँचा काफिया आहे. म्हणजे त्याला

स्वरकाफियाच समजायला हवें. तूर्तास जरा वेळ, बह्.,(वृत्त), मात्रा, ज़मीन, हा  विचार बाजूला ठेवू या. ‘जाँच्या ऐवजीजानअसा शब्द असता, आणि पुढचा एक काफिया, जो मुळातजहाँअसा आहे, त्याऐवजीजहानअसा असता, तर काफियाचा अंतिम वर्णहा असता, व मग ही  ग़ज़लस्वरकाफियावाली ग़ज़लझाली नसती, तीशुद्धकाफियावाली असती. पण, मुळातील  काफिये असे आहेत : जाँ, कहाँ, याँ, जहाँ, आशियाँ, नातवाँ. त्यामुळे, हीस्वरकाफियाची ग़ज़लच म्हणायला हवी ).

 • लाई हयात, आए ; क़ज़ा ले चली, चले

अपनी ख़ुशी न आए , न अपनी ख़ुशी चले ।

 • ज़ौक़

 • रोया करेंगे आप भी पहरों इसी तरह

अटका कहीं जो आपका दिल भी मेरी तरह ।

 • मोमिन

 • वो जो हम में तुम में क़रार था, तुम्हें याद हो के न याद हो

वोही यानी वादा निबाह का, तुम्हें याद हो के न याद हो ।

 • मोमिन

टीप : इथें रदीफ आहेतुम्हें याद हो के न याद हो’ . आणि काफियासाठीचे शब्द

आहेत,  था , का. म्हणजे  ‘आ’ हा स्वर काफिया झाला.

 

 • हम ही में थी ना कोई बात, याद तुमको ना आ सके

तुम ने हमको भुला दिया, हम ना तुम्हें भुला सके ।

 • हफ़ीज़ जालंदरी

 • अपनी धुन में रहता हूँ

मैं भी तेरे जैसा हूँ  ।

 • नासिर काज़मी

 • अँगड़ाई भी लेने न पाए उठा के हाथ

देखा जो मुझको, छोड़ दिये मुस्कुरा के हाथ  ।

 • निज़ाम रामपुरी

   ( टीप – ‘अँगड़ाईया विषयावरील हा एक श्रेष्ठ शेर 

  मानला जातोही ग़ज़लस्वरकाफियावालीआहे. )

 • महब्बत तर्क की मैंने, गरेबाँ सी लिया मैंने

ज़माने अब तो ख़ुश हो, ज़हर ये पी लिया मैंने ।

(तर्क : परित्याग )

 • साहिर लुधियानवी

 • मेरे हमनफ़स मेरे हमनवा मुझे दोस्त बनकर दग़ा न दे

मैं हूँ सोज़े इश्क़ से जाँबलब, मुझे ज़िंदगी की दुआ न दे ।

          (हमनफ़स , हमनवामित्र, दोस्त .     सोज़जलन, तपिश

   जाँबलब  –  मृतप्राय, On the verge of Death )

 • शकील बदायूनी

 

टीप : साहिर व शकील हे जरी सिनेगीतकार म्हणून ओळखले

जात असले, तरी मूलत: ते शायरच आहेत. ते नंतर सिनेसृष्टीत आले  ).

 • ये सारा जिस्म झुककर बोझ से दुहरा हुआ होगा

मैं सजदे में नहीं था, आपको धोखा हुआ होगा  ।

 • दुश्यंत कुमार

          जसा मराठीत, ‘सुरेश भट यांच्या आधीचीआणित्यांच्या नंतरची ग़ज़ल’,

असा युगाचा भेद दाखवला जातो, तसेंच हिंदीतदुश्यंतपूर्वआणिदुश्यंत के

बाद की ग़ज़लअसा युगभेद दाखवला जातो.  म्हणून दुश्यंत यांच्या ग़ज़लचें

उदाहरण, महत्वाचें आहे ).

 

     कांहीं मराठी ज्ञानवंत, ‘हिंदी गज़ल’ ने ग़ज़ल ची हानी केली आहे’

असें मानतात. मात्र, जशी अन्यभाषीय ग़ज़ल, जसें की मराठी ग़ज़ल किंवा

गुजराती ग़ज़ल, बंगाली ग़ज़ल, पंजाबी ग़ज़ल,  ही ‘उर्दू ग़ज़ल’ नाहीं, तर तिच्यापेक्षा भिन्न आहे ; तशीच ‘हिंदी ग़ज़ल’  सुद्धा उर्दू  ग़ज़लपेक्षा भिन्न आहे. दोघींचें व्याकरण मूलत: एकच असलें तरी .  हिंदी ग़ज़लची उर्दू ग़ज़लशी तुलना करून हिंदी ग़ज़लला कमी लेखायची आवश्यकता नाहीं. आणि तसेंही, बरेच ‘हिंदी’ ग़ज़लकार ‘हिंदुस्तानी’त लिहितात.

 

 • निष्कर्ष

वरील सर्व मत्ले  हे श्रेष्ठ शेर आहेत , व शायर हे श्रेष्ठ शायर आहेत ( मी स्वत: सोडून). त्यामुळे, वरील उदाहरणांकरून असें नक्कीच म्हणतां येईल की, काफिया हा  ‘स्वर-काफिया’ असणें यानें तसा कांहीं फरक पडत नाहीं. उर्दूत स्वर-काफिया मंज़ूर आहे. काफिया हा, स्वर-काफिया असो किंवा शुद्ध काफिया असो,  ग़ज़लियत ( म्हणजेंच ‘ग़ज़ल’ या काव्यप्रकाराच्या  खासियती त्या  विशिष्ट गझलमध्ये असणें’ )  हीच खरी महत्वाची गोष्ट .

– – –

 

–  सुभाष स. नाईक   Subhash S Naik

भ्रमणध्वनी : Mobile : 9869002126

ई-मेल : vistainfin@yahoo.co.in

GHAZAL AND SWAR-KAFIYA

                                             –

Summary  :   Using a ‘Swar Kafiya’ ( as against a ‘pure’ Kafiya ) does not make a difference. (Swar-Kafiya is accepted in Urdu. ) . What is more important in a Ghazal   is its ‘Ghazaliyat’ , i.e. having the main characteristic for  being a Ghazal.     

 

 

 

2 Comments

 1. वो जो हम में तुम में क़रार था, तुम्हें याद हो के न याद हो
  वोही यानी वादा निबाह का, तुम्हें याद हो के न याद हो ।

  मोमिन
  टीप : इथें रदीफ आहे ‘तुम्हें याद हो के न याद हो’ . आणि काफियासाठीचे शब्द

  आहेत, क़रार, निबाह .
  इथे काफिया चे शब्द था, का असे आहेत. बाकी सहमत.

  • नजरचूक सुधारल्याबद्दल धन्यवाद
   -सुभाष स. नाईक

Leave a Reply

Your email address will not be published.


*