क्षमस्व

 

‘आम्ही क्षमस्व आहो’ , मोबाइल बडबडताहे

‘तुम्ही क्षमस्व आहां , मग मीही क्षमस्व आहे’.

‘क्षमस्व’ म्हणजे काय? , कुणां हें नक्की ठाउक नाहीं

करता वापर हास्यास्पद , तिरकस प्रतिसादा मीही !

 

‘चूकच नाहीं’, अन् ‘सोऽ व्हॉऽट्’हि, भलता चढला पारा

क्षमस्व ;  खून करुन भाषेचा, खुशाल माथीं मारा.

क्षमस्व : (संस्कृत) : क्षमा कर ( अशी विनंती).

 

– – –

 

– सुभाष स. नाईक

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*