अमेरिकेतिल नवागत-नातवास

 नवागता, बाळा, तुज बघुनी

आनंदानें भरली कावड

मरुस्थला भिजवी श्रावणझड .

नवागता, नवकिरण भास्कराचा

शुभंकरा, तूं कळस मंदिराचा

आशीष तिथें देई प्रशांत-उदधी

देइ इकडुनी आशीर्वच हिमनिधी .

प्रशांतउदधी : Pacific Ocean

हिमनिधीहिमालय

बाळा, ‘उद्या’ची आशा तूं

ही समजशील कां भाषा तूं ?

एकच भाषा येते तुज  – ‘रुदन’

त्यानें प्रमुदित ‘काल’-‘उद्या’चे जन.

कालउद्याचे जन : Yesterday’s Generation,

  & Today’ Generation.

बाळा, तुझ्यासाठी  –

भंवतीची सृष्टी

करी पुष्पवृष्टी ;

‘Near & Dear’ नारी-नर

करती अविरत टाळ्यांचा गजर.

तुला पाहुनी, तुझे चाहते

म्हणत जवळचे-जन समस्त –

‘बाळा, तू चीज़ बड़ी है मस्त मस्त !’  .

– – –

 

  • सुभाष स. नाईक

Subhash S. Naik

M- 9869002126

eMail : vistainfin@yahoo.co.in

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*